
स्थैर्य, सातारा, दि. 8 : लहान मुलगा हिणवून बोलला म्हणून त्यास विचारणा केल्याचा राग मनात धरून एकास दोनजणांनी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, ढगेवाडी (लिंब), सातारा येथील तळेमाळ नावच्या शिवारात शिवाजी आप्पा वरकडे हे बांधावरील गवत काढत होते. यावेळी लहान मुलगा त्यांना हिणवून बोलला. त्या मुलास याचा जाब विचारल्याचा राग येवून प्रीती कृष्णात वरकडे वय 40 आणि कृष्णात हणमंत वरकडे वय 45 दोघे रा. लिंब, ता. सातारा यांनी दमदाटी व शिवीगाळ करत दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून हवालदार बागवान तपास करत आहेत.