
दैनिक स्थैर्य । दि.२१ मार्च २०२२ । मुंबई । वन मोटो इंडिया- भारतातील एलिगंट आणि प्रीमियम टू-व्हीलर ईव्हीचा पहिला ब्रिटिश ब्रँडने, रिलायन्स जनरल इन्शुरन्ससोबत भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. भागीदारीनंतर, रिलायन्स जनरल इन्शुरन्स केवळ वन मोटो इंडियाच्या सर्व ग्राहकांना मोटार विमा प्रदान करेल. नोव्हेंबर २०२१ मध्ये भारतात ईव्ही ब्रँड लाँच झाल्यापासून, ब्रँडला भारतातील ईव्ही खरेदीदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ३ महिन्यांच्या कालावधीत, तीन इलेक्ट्रिक स्कूटर्स- बायका, इलेक्टा आणि कम्युटा जाहीर करून ब्रँडने लॉन्चचा आक्रमक सपाटा सुरु केला आहे.
वन मोटो इंडियाचे विपणन आणि विक्री उपाध्यक्ष श्री आदित्य रेड्डी यांनी सांगितले की, “आम्ही सर्व पैलूंमधून सेवा आणि उत्पादन पोर्टफोलिओ मजबूत करत आहोत. आम्ही आधीच नवीन उत्पादन प्रकल्प आणि पाइपलाइनमध्ये गुंतवणूक योजना जाहीर केल्या आहेत. आमच्या तिन्ही उत्पादनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आम्ही रणनीतीशी सुसंगतपणे पुढे जात असताना, अत्यंत प्रतिष्ठित रिलायन्स जनरल इन्शुरन्स सोबत सहकार्य हा, आणखी एक मैलाचा दगड आहे. ग्राहकांना सेवा देण्यात आक्रमकपणे सुधारणा करण्याचे आणि ई-मोबिलिटीच्या मिशनमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याचे आमचे ध्येय आहे.”
ब्रँडने प्लांट लॉन्च करण्याच्या पहिल्या टप्प्यात किमान ४०,००० युनिट्सचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा ब्रँड, देशात ईव्ही परिवर्तन साध्य करण्यासाठी भारत सरकारच्या दृष्टीकोनाशी संरेखित चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी आक्रमकपणे काम करत आहे.