
दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२१ । खंडाळा । माने कॉलनी (भोळी) ता. खंडाळा येथील 38 वर्षीय पोपट गोविंद चव्हाण हे शेतात गुरे घेऊन बांधण्यासाठी जातो असे सांगून 13 सप्टेंबर 2021 रोजी 10 वाजता बेपत्ता झाल्याची फिर्याद कोमल पोपट चव्हाण यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास शिरवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला हे करीत आहेत.