दैनिक स्थैर्य | दि. ३ जुलै २०२४ | फलटण |
भविष्यातील ‘ग्लोबल वॉर्मिग’चा धोका लक्षात घेता लोकसहभागातून वृक्षारोपण करण्याची गरज आहे. त्याचाच भाग म्हणून वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून काळुबाईनगर येथे वडाचे झाड तसेच दत्त मंदीर परिसरात वृक्षारोपण करून त्याची सुरुवात करण्यात आली. यापुढे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा पालखी सोहळा फलटणवरून जाताच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व तालुक्यात एक लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे, अशी माहिती अशोकराव जाधव यांनी दिली आहे.