
दैनिक स्थैर्य । 11 जुलै 2025 । फलटण । फलटण- पंढरपुर पालखी महामार्गावरील धुळदेव, ता.फलटण येथे बुधवार दि.
दि.09 रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ट्रक चालक गणपत भानुदास उगलमोगले (रा. शोकासन, ता. माण, जि. सातारा) यांनी अशोक लेलंड कंपनीचा ट्रक क्र. एमएच. 11 सीएच 3160 भरधाव वेगात चालवून समोरील बाजूने येणार्या दत्तात्रय बिरमल खरात (वय 53) रा. धुळदेव, ता.फलटण हे चालवित असलेल्या हिरो कंपनीच्या एच.एफ.डिलक्स मोटार सायकल क्र. एमएच 11 सीपी 5382 ला समोरील बाजुने जोरात धडक दिली.
यामध्ये दत्तात्रय बिरमल खरात (वय 53) ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला.
त्याच्याविरोधात चैतन्य तानाजी खरात (वय 28) व्यवसाय- शेती, रा.धुळदेव, ता.फलटण यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल झाला.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.