
दैनिक स्थैर्य । 10 मार्च 2025। सातारा । पुणे- बेंगलोर महामार्गावर शेंद्रे (ता. सातारा) गावाच्या हद्दीत एका ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला.
दिगंबर मनोज शिंदे (तामकणे, ता. पाटण), असे मृताचे नाव आहे. योगिता (दुर्गा) काशिनाथ जाधव (अरुणोदय हाऊसिंग सोसायटी, शिवराज पेट्रोल पंपमागे, कोडोली, सातारा. मूळ रा. निवकणे, ता. पाटण) असे जखमीचे नाव आहे.
ट्रकचालक धनाजी वसंत भोसले (केळवडे ता. भोर) याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.