दैनिक स्थैर्य | दि. ११ डिसेंबर २०२४ | फलटण |
जिंती (ता. फलटण) गावच्या हद्दीत जिंती ते फलटण जाणार्या रस्त्यावर ९ डिसेंबर रोजी मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात एकजण ठार झाला आहे. या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून प्रवीण प्रमोद भापकर (वय ३५, राहणार लाटे, तालुका बारामती, जिल्हा पुणे) असे अपघाताची मृताचे नाव आहे.
जिंती ते फलटण रस्त्यावर जिंती गावच्या हद्दीत प्रवीण प्रमोद भापकर हा चालवित असलेल्या मोटरसायकलच्या (क्र. एमएच ४२ एबी २७९१) झालेल्या अपघातात मोटारसायकल त्याच्या अंगावर पडून तो बेशुद्ध पडला होता. त्यास पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.
या अपघाताचा अधिक तपास सहा. फौजदार हजारे करत आहेत.