यात्रेतील गाड्याचे चाक छातीवरून गेल्याने एक ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२२ । वाई ।  कडेगाव (ता. वाई )येथील जनाई देवीच्या यात्रेत पारंपरिक मिरवणुकीत गाड्याचे दगडी चाक छाती वरुन गेल्याने एक जण ठार झाला आहे.

शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. येथील ग्रामदैवत जानाई देवीची पारंपारिक यात्रेदरम्यान बैलांनी ओढून गाड्याची मिरवणूक निघते .यावेळी गाड्यावर मानकरी बसलेले असतात.शनिवारी गाड्याच्या मिरवणुकीच्या वेळी गाडा वेशीवर जाऊन परत गावाकडे येत असताना गाडा शेतामध्ये अडकल्याने बैलांनी कडून ओढून बाहेर काढत असताना सागर माधवराव मुरूमकर (वय३०) हे गाड्या वरून खाली कोसळले. त्यांच्या छातीवरून गाड्याचे चाक गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.त्यांना येथील खाजगी रुग्णालयात उपचार साठी नेले असता एक मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .याबाबत संग्राम मुरुमकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. सागर मुरूमकर यांच्या मागे आई वडील पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. यावेळी दोघे गाड्या पडून वरून किरकोळ जखमी झाले याची नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही.अधिक तपास पोलीस हवालदार मदन वरखडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!