आयरिश टेम्पो झाडाला धडकल्याने १ ठार तर १ जखमी


दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२१ । कोरेगाव । सर्कलवाडी तालुका कोरेगाव येथे काटकर वस्तीजवळ आयरिश टेम्पो वडाच्या झाडाला धडकल्याने एकजण ठार व १ जखमी झाल्याची घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

वाठार स्टेशन पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार वाई सिद्धनाथवाडी येथील चंद्रकांत ज्ञानोबा जायगुडे वय 62 व त्यांच्यासोबत त्यांचा मेहुणा योगेश जगन्नाथ जगताप हे टाटाआयरिश टेम्पो क्रमांक MH11BH-3705 हे वाई वरून वाठारच्या दिशेने भरधाव वेगात येत असताना सर्कलवाडी तालुका कोरेगाव येथील काटकर वस्ती जवळ रोडच्या बाजूला असणाऱ्या वडाच्या झाडाला टेम्पो धडकला यामध्ये टेम्पोतील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना पिंपोडे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी टेम्पो चालक चंद्रकांत ज्ञानोबा जायगुडे यांना मयत असल्याचे घोषित केले. या घटनेची खबर अशोक विठ्ठल जगताप राहणार सोनगिरवाडी वाई यांनी वाठार पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास वाठार पोलिस करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!