स्थैर्य,औरंगाबाद,दि.१ : देशातील अनेक भागात शेतीसंदर्भातील अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. अनेक ठिकाणी पाऊस नाही तर दुष्काळामुळे शेती पिकवणं अवघड झालं आहे. शेतात जितका खर्च केला तितकं तरी उत्पन्न येऊ देत यासाठी शेतकरी प्रार्थना करीत आहे. अशातच बिहारमधील औरंगाबाद या भागात 82 हजार रुपये किलो विकणारी भाजी पिकवली जात आहे. या भाजीची शेती केली जाते, शिवाय याचे खरेदीदारदेखील आहे. ही जगातील सर्वात महागडी भाजी असल्याचे सांगितले जाते. या भाजीची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. औरंगाबादमधील हा शेतकरी जगातील सर्वात महागडी शेती करीत आहे. जवळपासच्या लोकांना हा शेतकरी नेमकी कसली शेती करतो हे कळत नाही. शिवाय इतकी महागडी भाजी कोणाला विकली जात असेल, असेही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जगातील सर्वात महागडी भाजी – Hop Shoots
जगातील सर्वात महागड्या भाजीचं नाव हॉप शूट्स (Hop Shoots) आहे. एक किलो Hop Shoots ची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 1000 युरो म्हणजेच 82 हजार रुपये आहे. ही भाजी सर्वसाधारणपणे दुकानात वा भाजी विक्रेत्यांकडे पाहायला मिलत नाही. जर तुम्हाला ही भाजी पाहावयाची असेल तर औरंगाबादमधील शेतकरी अमरेश कुमार सिंह यांच्या शेतात यावं लागेल. नवीनगर प्रखंड येथील करमडीह गावात याची शेती पिकवली जात आहे. अमरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय भाजी अनुसंधान वाराणसी कृषी वैज्ञानिक डॉक्टर लाल यांच्या निदर्शनाखाली या भाजीची ट्रायल शेती करण्यात आली आहे. 2 महिन्यांपूर्वी याचं रोप लावण्यात आलं होतं, आता हळूहळू हे रोप मोठं होत आहे. रोपांबरोबरच अमरेश यांच्या अपेक्षाही वाढत आहे.
औषध आणि बिअर तयार करण्यासाठी Hop Shoots चा वापर
Hop Shoots भाजी बाजारात उपलब्ध होत नाही. याचा वापर अॅंटीबायोटीक औषधं तयार करण्यासाठी आणि TB च्या आजारात औषध तयार करण्यासाठी केला जातो. या रोपांच्या फुलांचा वापर बिअर तयार करण्यासाठी केला जातो. या फुलांना हॉप कोन्स म्हणतात. तर बाकी फांद्यांचा उपयोग खाण्यासाठी केला जातो. यापासून लोंचही तयार केलं जातं, मात्र ते बरंच महाग असतं.
यूरोपीय देशांमध्ये Hop Shoots ची मागणी
यूरोपीय देशांमध्ये या भाजीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. ब्रिटेन आणि जर्मनीतील लोकांना ही भाजी आवडते. वसंत ऋतू सुरू हा हॉप शूट्स या भाजीसाठी फायदेशीर आहे. भारत सरकार सध्या भाज्यांचं वैज्ञानिक रिचर्स करीत आहे. वाराणसी येथील भाजी अनुसंधान संस्थेत या भाजीच्या शेतीवर बरंच काम सुरू आहे. अमरेश यांनी या शेतीसाठी विनंती केली होती, जिला मान्यता देण्यात आली. जर त्यांचं नशीब चांहलं असेल तर शेतकऱ्यांचं नशीब बदलू शकतं.