कबुतरे मारण्यावरून कोयता व दांडक्याने हल्ला एकजण जखमी, सहा जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १८: कोडोली बौद्धवस्ती, सातारा येथे कबुतरे मारल्याच्या कारणावरून एकास सहाजणांनी कोयता, दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांत सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश सुरेश किर्तीकुडाव, अक्षय बबन किर्तीकुडाव, स्वप्नील पोपट गायकवाड, शुभम सुरेश गायकवाड, जीवन जगन्नाथ गायकवाड, नवीन गायकवाड रा. बौद्धवस्ती कोडोली, अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत अनिकेत वसंत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोडोली बौद्धवस्ती येथे भानुदास किर्तीकुडाव यांच्या किराणा मालाच्या दुकानासमोर अनिकेत गायकवाड थांबले होते. यावेळी तेथे आरोपी महेश सुरेश किर्तीकुडाव याने अनिकेत गायकवाड यांना कबुतरे का मारली असे म्हणत हनुवटीवर कोयता मारला. यावेळी अक्षय बबन किर्तीकुडाव याने फिर्यादीच्या गालावर दांडके मारले स्वप्नील गायकवाड याने शर्टला धरून जमीनवर पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी अनिकेत गायकवाड जखमी झाले. यावेळी फिर्यादीचे चुलते केतन गायकवाड यांनी पुतण्यास का मारले असे विचारले असता आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की करून दमदाटी केली. याप्रकरणी सर्व सहाजणांवर गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस हवालदार सुतार करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!