पतंगाचा मांजा गळ्यास लागल्याने फलटणमध्ये एक जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण-लोणंद रोडवर रानडे पेट्रोलपंपासमोर ९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दिपक अर्जुन लांडगे (वय ३५, रा. सोनगाव, ता. फलटण) हे मोटारसायकलवरून जात असताना पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्यास अडकून कापल्याने त्यांच्या गळ्यास व नाकास जखम झाली आहे. याबाबतची फिर्याद लांडगे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी पतंग उडविणार्‍या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Back to top button
Don`t copy text!