स्थैर्य, सातारा, दि. 6 : सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी तब्बल 25 लाखांची लाच मागणारा माहुुली दूरक्षेत्रातील सहायक पोलिस निरीक्षक अँटिकरप्शनच्या जाळ्यात अडकला आहे. यामुळे सातारा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. धोंडीराम शिवाजी वाळवेकर धोंडीराम शिवाजी वाळवेकर वय-37, रा. तामजाई नगर सातारा मूळ रा. बाजार भोगाव, ता. पन्हाळा असे असे संबंधित पोलिस अधिकार्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी संंबंधित तक्रारदारशी संबंधित सातारा शहर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत माहुली पोलिस दूरक्षेत्रात तक्रादारावर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यासंदर्भात मदत करण्यासाठी येथील सहायक पोलिस निरीक्षक धोंडीराम शिवाजी वाळवेकर याने तक्रारदाराला 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने सातारा अँटिकरप्शनच्या ऑफिसमध्ये तक्रार दिली. त्यानंतर अँटिकरप्शनने केलेल्या पडताळणी कारवाईमध्ये धोंडिराम वाळेकर याने 25 लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यास अँटिकरप्शनने अटक केली. त्याच्यावर लाचलुचपतप्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अँटिकरप्शन ब्रँच (पुणे)चे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अशोक शिर्के, पोलिस निरीक्षक अविनाश जगताप, पो.ना. विनोद राजे, पो. कॉ. संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले आदींनी केली.