दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२२ । फलटण । महाराष्ट्र राज्य उच्चमाध्यमिक व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च/एप्रिल – 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. कोळकी, फलटण येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता 12 वी वाणिज्य शाखा (इंग्रजी माध्यम) चा निकाल शंभर टक्के लागला आहे.कु.नामदास स्नेहा बापूराव हिने 73.67टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. झेंडे ओम प्रफुल्ल 69.33 टक्के गुण व्दितीय, तृतीय क्रमांक मिळवला तर कु. जनोडवला जनेब मुस्तफा 62.67% टक्के गुण संपादन करुन तृतीय क्रमांक मिळवला आहे . यांच्यासह इ.10 वी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे शाळेची इयत्ता 10 वी ची हि तिसरी बॅच आहे आणि तिन्हीही बॅचचा 100%टक्के निकाल लागला आहे.कु.धुमाळ आदीत्य मच्छिंद्रनाथ याने 95.80%टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. चव्हाण सोहम दत्तात्रय याने 94.20% गुण मिळवून शाळेतून द्वितीय क्रमांक मिळवला आहे व कु.निबांळकर सिद्धी प्रवीण 92.20% गुण मिळवून शाळेतून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कु.कदम शिरीष संभाजी याने 91.40% आणि कु.शेख माजिद आसिफ 90.80% यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
तसेच सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज 10 वी व 12 वी चा निकाल 100% लागल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रदीप माने सर, संस्थेचे सचिव श्री. विशाल पवार सर व संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड मॅडम व संचालिका सौ.प्रियांका पवार मॅडम तसेच प्राचार्य श्री.संदीप किसवे सर, पर्यवेक्षक अमित सस्ते, समन्वयिका सौ. माधुरी काटकर,सौ.सुवर्णा निकम,सौ. योगिता सस्ते यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.इ.10 वी च्या विद्यार्थ्यांना सौ.सुजाता गायकवाड ,वर्गशिक्षक श्री.मंगेश देशपांडे,श्रीमती आशा भराडे,श्री. ज्ञानेश्वर जाधव,श्री.विजय मदने,सौ.मंदाकिनी गोडसे यांनी तर इ.12 वी च्या विद्यार्थ्यांना श्री.सुनिल अहिरे ,सौ.शिल्पा कदम, श्री.निखिल कापले,सौ.कोमल निंबाळकर व सौ.अमृता गोसावी या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गुणवत्तापुर्ण शिक्षण देणाऱ्या सर्व स्टाफचे देखील सौ.संध्या गायकवाड मॅडम यांनी अभिनंदन केले.