मसूर परिसरात सोळा गावात एक गाव एक गणपती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि. ०४ : कोरोना विषाणूच्या महामारीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याबाबत व एक गाव एक गणपती बसविण्याबाबत पोलिसांनी केलेल्या आवाहनास मसूर दूरक्षेत्रातील 32 पैकी 16 गावांनी प्रतिसाद देत एक गाव एक गणपती बसवण्याचा निर्णय घेतल्याने उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड व मसूर दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर पोलीस दूरक्षेत्र उपनिरीक्षक प्रवीण जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी मसूर दूरक्षेत्राच्या हद्दीतील गावोगावी गावातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या बैठका घेत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच एक गाव एक गणपती बसविण्याबाबत आवाहन केले होते. पोलिसांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मसूर दूरक्षेत्राच्या हद्दीतील पाचुंद, खराडे, अंतवडी, रिसवड, शहापूर, पिंपरी, कोणेगाव, वाण्याचीवाडी, वाघेश्‍वर, यादववाडी, चिंचणी, जुने कवठे, नवीन कवठे, केंजळ, खोडजाईवाडी, कचरेवाडी, बेलवाडी या गावांनी एक गाव एक गणपती बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

मसूर दूरक्षेत्र हद्दीतील इतर गावांतही पोलिसांनी बैठका घेण्याचे आयोजन केले आहे. यावर्षी गणेशोत्सवात कोणतीही आगमन अथवा विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. देखावे करता येणार नसल्याचे सांगून मसूर, हेळगाव, किवळ, शामगाव या मोठ्या गावांमधून एक गाव एक गणपती यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मसूर दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!