“कुटुंब प्रमुखाचा टेंभा मिरवला म्हणून कुणी कुटुंब प्रमुख होत नसतो” – चित्रा वाघ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२३ । मुंबई । उद्धव ठाकरे यांनी “काही बोगस लोक म्हणताहेत मी मतांची भीक मागायला आलोय. मी मतांची भीकच मागतो, बोगस उद्योग करत नाही” असं म्हणत भाजपावर टीकास्त्र सोडलं. ते अमरावती येथे आयोजित सभेत बोलत होते. मी घरी बसलो पण मी घरफोडी केली नाही. तुम्ही घरफोडे आहात. मी घरी बसलो होतो, तरी सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. मला कितीही काहीही म्हणा की मी घरी बसून काम केलं. मी घरी बसून जे काम केलं ते तुम्हाला घरं फोडूनही करता येत नाही अशी टीकाही ठाकरे यांनी केली. याला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.

“केवळ कुटुंब प्रमुखाचा टेंभा मिरवला म्हणून कुणी कुटुंब प्रमुख होत नसतो” असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. तसेच “उद्धव ठाकरेजी त्यासाठी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागते. जनता तर दूरच… तुम्हाला स्वतःचा पक्षही सांभाळता आला नाही, हीच वस्तूस्थिती” असं म्हणत हल्लाबोल देखील केला. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

“शासन आपल्या दारी म्हणत शिंदे – फडणवीसांचं सरकार प्रत्येक घराघरात पोहचतयं… कारण आम्ही जनतेतलेच एक आहोत… जनता हेच आमचे कुटुंब आहे नि जनतेची सेवा हीच सरकारची प्राथमिकता आहे. केवळ कुटुंब प्रमुखाचा टेंभा मिरवला म्हणून कुणी कुटुंब प्रमुख होत नसतो… उद्धव ठाकरेजी त्यासाठी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागते. जनता तर दूरच… तुम्हाला स्वतःचा पक्षही सांभाळता आला नाही, हीच वस्तूस्थिती आहे” असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


Back to top button
Don`t copy text!