
दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२२ । सातारा । चक्कर येऊन पडून एकाचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ मार्च रोजी ८ वाजण्यापूर्वी युवराज बाळासाहेब जाधव, वय ३१, रा. नेले, ता. सातारा हे चक्कर येऊन पडले, त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची खबर शिवराज बाळासाहेब जाधव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली.