
दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । सातारा । विषारी द्रव प्राशन केल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना दि. ७ जुलै रोजी गजवडी, ता. सातारा येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मंगळवार पेठ, सातारा येथे राहणाऱ्या अशोक संपत अडागळे वय ५६ रा. गजवडी ता. सातारा याने दि.७ जुलै रोजी राहत्या घरी विषारी औषध द्रव घेतल्याने त्याला येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची खबर डॉ. महाजन यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. याबाबतचा अधिक तपास पो. हवा. कदम हे करीत आहेत.