कृषी विभागामार्फत धुमाळवाडी येथे एक दिवस बळीराजासाठी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । फलटण । धुमाळवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथे कृषि विभागा मार्फत एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत डॉ. कैलास मोते, संचालक (फलोत्पादन) महाराष्ट्र राज्य यांनी धुमाळवाडी ता. फलटण जि. सातारा येथील शेतकर्‍यांशी संवाद साधला.

यावेळी शेतकरी शरद पवार यांच्या सिताफळ, संजय धुमाळ यांच्या पेरू, राहुल पवार यांच्या अंजीर, भुजंगराव निकम यांच्या द्राक्ष आणि राजाराम पवार व सुशील फडतरे यांच्या ड्रॅगन फ्रुट फळबाग क्षेत्रास भेट देऊन शेतकर्‍यांशी चर्चा केली.

सर्व शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या विविध अडचणी तसेच फलोत्पादन अभियानांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध योजना व प्रक्रिया उद्योग बाबत चर्चा व सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

धुमाळवाडी गावात 100 % क्षेत्रावर फळपिके घेत आहेत त्या बाबत सर्व शेतकर्‍यांचे कौतुक केले व आवश्यक ते सर्व सहकार्य करणेबाबत शेतकर्‍यांना आश्वस्त केले.

यावेळी धुमाळवाडी गावातील शेतकर्‍यांना शेतकरी मासिकाचा योजना विशेषांक वाटप करण्यात आला. यावेळी डॉ कैलास मोते यांच्या हस्ते श्री सचिन जाधव कृषि सहाय्यक यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी विजयकुमार राऊत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सातारा, भास्करराव कोळेकर उपविभागीय कृषि अधिकारी फलटण, सागर डांगे तालुका कृषि अधिकारी फलटण, अमोल सपकाळ मंडळ कृषि अधिकारी विडणी, अशोक जगदाळे कृषि पर्यवेक्षक विडणी 1, योगेश भोंगळे कृषि पर्यवेक्षक विडणी 2, कृषि सहायकसचिन जाधव, सरपंच सौ. पल्लवी पवार मॅडम व ग्रामपंचायत सदस्य समीर पवार, प्रगतशील शेतकरी रवींद्र धुमाळ, राजराम पवार,नीलकंठ धुमाळ, रामदास पवार, पंकज फडतरे,आनंद धुमाळ,चेतन धुमाळ, श्रीकांत फडतरे, हरीश हुंबे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!