मुधोजी महाविद्यालयात एकदिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमानाने एकदिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून श्री. उत्तमराव पवार (पीएसआय, तहसीलदार तथा संचालक लॉयन राजमुद्रा अकॅडमी, लातूर) आणि श्री. आप्पासाहेब पासले (सहाय्यक गटविकास अधिकारी) हे उपस्थित होते.

पवार सरांनी भाषणांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वतःच्या क्षमता ओळखा, अडचणींना सामोरे कसे जायचे, आकर्षणाचा सिद्धांत, सुरुवात मोठ्या ध्येयापासून करायची, एखाद्या गोष्टीवर शंभर टक्के लक्ष कसे द्यायचे आणि तुमच्या अभ्यासामध्ये योग्य ते नियोजन कशाप्रकारे करायचे अशा गोष्टींबरोबरच अभ्यासाची नेमकी सुरुवात कशी करायची, अभ्यासक्रम व आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण कशाप्रकारे करायचे, या सर्व बाबींवर मार्गदर्शन केले.

पासले यांनी संयम, योग्य ते नियोजन आणि त्याचबरोबर हार्डवर्ककडून स्मार्टवर्ककडे कसे जायचे याचा मूलमंत्र दिला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर यांनी स्पर्धा परीक्षेचा नेमका मूलमंत्र काय असतो, यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. गिरीश पवार यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. अभिजीत धुळगुडे यांनी यशस्वीपणे पार पाडली. आभार प्रा. अभिजीत कदम यांनी मानले.

या कार्यशाळेचा १८९ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सहसमन्वयक प्रा. आकाश जाधव आणि केंद्राच्या सर्व सदस्यांनी ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!