
दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । सातारा । धोंडेवाडी, ता. जावली येथे ठिकाणी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१० नोव्हेंबर रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास धोंडेवाडी येथे नितीन सुनील झोरे, वय २३, राहणार सह्याद्री नगर, सांगवी मुरा, ता. जावली याने राहत्या घरी लोखंडी अँगल ला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर अंकुश बाबुराव ढेबे यांनी मेढा पोलीस ठाण्यात दिली.