नैराश्येतून नागठाणेत एकाची आत्महत्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नागठाणे, दि.१: नागठाणे (ता.सातारा) येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.योगेश सूर्याजी मगर (वय.४४) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार योगेश मगर हा त्याच्या आईसोबत नागठाणे येथे राहत होता.त्याने गावातच मेन रोडवर असलेले एक दुकान भाड्याने घेऊन टेलरिंग व्यवसाय करत होता.झोपण्यासाठी तो नेहमी रात्री दुकानातच जात होता.त्याचे लग्न होत नसल्याने काही काळापासून तो नैराश्याने ग्रासला होता.त्यातच त्याला दारूचे व्यसन लागले होते. शनिवारी दिवसभर योगेश घरी न आल्याने त्याची आई रात्री उशिरा दुकानात गेली.दुकानाचे शटर उघडून बघितले असता योगेश मगर याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.याची फिर्याद चंद्रकांत रघुनाथ साळुंखे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली.पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!