
स्थैर्य, सातारा, दि.२१: सातारा नजिकच्या महादरे तलावात रविवारी रात्री एकाने उडी मारून आत्महत्या केली. विजय प्रतापसिंह गुजर (वय 50) रा. आंबवडे बुद्रुक असे मृताचे नाव आहे. याच तलावात गडकर आळीतील एकाने आत्महत्या केलर दिवस उलटत नाही तोवर ही घटना घडली आहे.
या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम सातारा यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाच्या खिशात आढळून आलेल्या पाकीटातील कागद पत्रावरून ओळख पटली आहे. सातारा तालुका पोलीस तपास करत आहेत. चार दिवसांत दोनजणांनी तलावात आत्महत्या केल्यामुळे तलावाला जाळी लावावी, अशी मागणी होत आहे.