सातारा तालुक्यातील वर्ये येथील एकाची आत्महत्या


दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा तालुक्यातील वर्ये येथील प्रदीप एकनाथ ननावरे (वय ४८) यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, प्रदीप यांनी दारुच्या नशेत आत्महत्या केली असल्याचे सातारा तालुका पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, प्रदीप ननावरे यांनी दि. २८ रोजी सकाळी आठ वाजण्यापूर्वी दारुच्या नशेत वर्ये येथील एका झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. याची खबर संकेत प्रदीप ननावरे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद झाली आहे. अधिक तपास हवालदार घोरपडे हे अधिक तपास करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!