
दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२१ । सातारा । लोणंद येथील गोटेमाळ येथे राहणारे महादेव खशाबा करे यांनी आपल्या रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
कापडगाव, ता. फलटण येथील महादेव करे हे लोणंद येथील गोटे माळ परिसरात रहात होते. काल दि.29 रोजी रात्री 11.00 वा . सुमारास महादेव करे वय 50 वर्षे हे नेहमी प्रमाणे बेडरूमचा दरवाजा लावुन झोपले होते . त्यांचा दरवाजा ठोठावला परंतु त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यावेळी घरातील लोकांना संशय आल्याने त्यांनी बेडरूमचा दरवाजा तोडला असता महादेव करे यांनी गळफास घेतलेले दिसल्याने त्यांना लगेच उपचार करीता लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले परंतु त्यांचा मुत्यु झाला होता. महादेव करे यांचा टेम्पो व्यवसाय होता. त्यानंतर मिनरल वॉटरचा प्लॅन्टही त्यांनी सुरू केला तर काहीच दिवसांपुर्वी यशोदा घरगुती खानावळ सुरू केली होती.
याबाबतची खबर त्यांचा मुलगा योगेश करे यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली असुन पुढील तपास सपोनि विशाल वायकर व पो हवा पवार करीत आहेत.