पोलीस ठाण्यात खोटा फोन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । 2 मे 2025। फलटण । साठे, ता. फलटण येथील रविंद्र बाळासो कदम (वय 48 वर्षे) यांनी घरगुती भांडणात मारहाण होऊ शकते असा खोटा फोन केला. व पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी दिली.

याबाबत पोलीस नाईक सागर अभंग यांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस नाईक सागर अभंग यांना 1 मे रोजी पोलीस ठाण्यात 112 डाईल वर कर्तव्यावर होते. दरम्यान रात्री 8. 25 मिनिटांनी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ओंबासे यांचा फोन वरुन सांगितले की, साठे , ता. फलटण येथील रविंद्र कदम यांच्याकडे घरगुती भांडण सुरू आहे व त्यांना मारहाण होऊ शकते, असा डाईन 112 वर कॉल केला आहे.

दरम्यान, पोलीस नाईक सागर अभंग व गणेश ओंबासे हे साठे येथे चौकशीसाठी गेले. होते. त्याठिकाणी त्यांनी पोलीस पाटील विश्वास काकडे यांना बोलावले. त्यानंतर मोबाईल नंबर 7499523587 वर फोन केला असता तो फोन बंद लागल्याने रविंद्र कदम यांच्या घरी गेले. त्यावेळी रविंद्र कदम हे घरात झोपले होते. त्यावेळी रविंद्र कदम यांना आपण डाईन 112 कॉल केल्याचेे विचारले असता त्यांनी कॉल मीच केला असल्याचे सांगितले. आपणास कोण त्रास देत आहे, याबाबत विचारले असता त्यांनी मला असा कोणीही त्रास देत नसल्याचे सांगितले. घरच्यांविरोधात रागाचे भरात खोटा कॉल केला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे रविंद्र कदम यांनी डाईल 112 वर खोटा कॉल केला असल्याचे निदर्शनास आले. पोलीस विभागाची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!