किरकोळ वादातून ढवळेवाडीत एकावर कुर्‍हाडीने हल्ला


दैनिक स्थैर्य । दि. 14 सप्टेंबर 2021 । फलटण । ढवळेवाडी (ता.फलटण) येथे गोठ्या शेजारी म्हैस बांधल्याच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादातून एकावर कुर्‍हाडीने हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पालीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 12 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मौजे ढवळेवाडी (ता.फलटण) गावच्या हद्दीत फिर्यादी सुनिल तानाजी माने (वय 45, व्यवसाय – ड्रायव्हर, रा.ढवळेवाडी) यांच्या गोठ्याच्या शेजारी म्हैस बांधलेली होती. तेव्हा सुनिल माने यांनी वैभव विलास माने (वय 30, रा.ढवळेवाडी) यास ‘तू माझ्या गोठ्या शेजारी म्हैस का बांधली?’ असे विचारले असता वैभव माने याने चिडून चावून फिर्यादी सुनिल माने यांच्या डोक्यात लोखंडी कुर्‍हाड मारुन त्यांना गंभीर जखमी केले.

वैभव माने यास पोलीसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस नाईक गलियल हे करीत आहेत.

 


Back to top button
Don`t copy text!