दैनिक स्थैर्य | दि. १९ डिसेंबर २०२४ | फलटण |
कोळकी (फलटण) येथील मुंबईकर बझार या दुकानासमोर बुधवारी दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास कारला कार घासल्याने ‘तू मला साईट का दिली नाहीस’ असे म्हणत एकास लाथाबुक्क्यांनी तसेच गाडीच्या चावीच्या टोकदार वस्तूने फिर्यादी कारचालक (क्र. एमएच ४२ एएक्स ६०१०) शशिकांत केशव चतुरे (वय ४०, रा. सुरवडी बुद्रुक, ता. फलटण) हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी स्विफ्ट डिझायर गाडी (क्र. एमएच ११ सीएच ५६४७) वरील अज्ञात चालकाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या अपघाताचा अधिक तपास म.पो.ना. हेमा पवार करत आहेत.