दहा हजाराची लाच स्वीकारताना फलटणमध्ये एकाला अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 27 डिसेंबर 2022 | फलटण | शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण वरिष्ठ कार्यालयात मंजुरी करता पाठविण्यासाठी 10 हजार रुपयाची लाच स्वीकारताना येथील तालुका कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षकास लाच लुचपत विभागाने अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फलटण तालुक्यातील 46 वर्षीय तक्रारदार व्यक्तीने त्यांच्या मयत पत्नीचे शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण मंजुरीसाठी तालुका कृषी विभागाकडे दिले होते. हे शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण वरिष्ठ कार्यालयात मंजुरी करता पाठविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय फलटणमधील कृषी पर्यवेक्षक बाळू निवृत्ती गावडे (वय 52) रा. प्लॉट नंबर 3, अष्टविनायक रो हाऊस सोसायटी, प्रगती नगर बारामती (ता. बारामती, जि. पुणे) याने 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ती लाच रक्कम स्वीकारताना बाळू गावडे याला लाच लुचपत विभागाने सापळा रचून अटक केली.

सदरची कारवाई पुणे लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस नाईक विनोद राजे, पोलीस शिपाई तुषार भोसले यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!