दैनिक स्थैर्य । दि.०७ जानेवारी २०२२ । सातारा । ओगलेवाडी, ता. कराड येथे बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली आहे.
बुधवार दि 5 रोजी दुपारी ओगलेवाडी चौक येथील भाजी मंडई परिसरात कारवाई करण्यात आली, मुबिन युन्नूस पटेल (वय 26) रा. हजारमाची ता. कराड असे बेकायदेशीर रित्या पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक केलेल्या संशयीत व्यक्तीने नाव आहे…!!!
या बाबत पोलिस दलाकडून मिळालेली माहिती अशी, जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्याकडून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या वर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रणजित पाटील व वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री बी आर पाटील यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना केली होती.
सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री विजय गोडसे यांना बुधवारी 5 रोजी मुबिन युन्नूस पटेल यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली त्यानुसार विजय गोडसे यांच्यासह उपनिरीक्षक पतंग पाटील पोलिस नाईक बाबूराव यादव पोलिस नाईक राजश्री शिंदे काॅन्स्टेबल धिरज कोरडे सागर चव्हाण यांनी ओगलेवाडी चौकात थांबलेल्या मुबिन युन्नूस पटेल याच्याकडून 90 हजार रूपये किमतीची पिस्तूल हस्तगत करून त्याला अटक केली…!!!
याबाबत ची नोंद कराड शहर पोलिस स्टेशन ला झाली आहे, दरम्यान शहर व परिसरात बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्याची माहिती पोलिसांना कळवावी असे आवाहन शहर पोलिस दलाकडून करण्यात आले आहे…!!!