मोटर सायकल चोरी प्रकरणी एकजण ताब्यात


दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑक्टोबर २०२२ । सातारा । मोटर सायकल चोरी प्रकरणी एकाला कोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 23 ऑक्टोबर रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक विधी संघर्ष बालक हा त्याच्या ताब्यातील हिरो होंडा पॅशन प्रो मोटर सायकल क्र. एमएच 12 इएस 6447 सातारा-पुसेगाव रस्त्यावर चालवताना आढळून आला. त्याच्याकडे गाडीची कागदपत्र व मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता न आल्याने त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारणा केली असता त्याने ही मोटरसायकल सातारा येथील एलबीएस कॉलेज परिसरातून चोरल्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक आवटे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!