मांडुळ तस्करीप्रकरणी एकास अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०४ फेब्रुवारी २०२२ । वडूज । वडूज वनपरिक्षेत्रातील वडी (ता. खटाव) येथे जीवंत मांडुळ अवैद्यरित्या पकडून घरी ठेवल्या प्रकरणी गावातील नवनाथ भागवत येवले (वय 42) यास वनविभागाने अटक केली आहे.

या मांडुळ तस्करी प्रकरणी माहिती मिळताच सातारा येथील सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती आर. ए. कोरकाटे, वडूज विभागाचे वनपाल रामदास गावटे, वनरक्षक बी. एस. जावीर, डी. एन. होनमाने, वनरक्षक एस. एम. तांबोळी, ए. आर. दहिथळे यांनी येवले यास मुद्देमालासह ताब्यात घेवून त्याच्याविरोधात औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व सहकारी अधिक तापस करीत आहेत. येवले यांच्याजवळ सापडलेल्या मांडुळाची लांभी 1 मीटर, घेरी 0.13 मीटर असून त्याचे वजन अंदाजे 25 ते 30 कि.ग्रॅम आहे. दरम्यान या प्रकरणी संशयित येवले यास दोन दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
फोटो ओळी : वडी : येथील नवनाथ येवले यास जिवंत मांडुळासह ताब्यात घेताना वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी.


Back to top button
Don`t copy text!