आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकास अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 10 : बनावट फेसबूक अकाउंटद्वारे एकास बहिणीचा मोबाईल नंबर मागून व पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत मानसिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवाजीनगर येथील एकास अटक करण्यात आली आहे. आकाश प्रकाश माने-केंडे वय 20, रा. शिवाजीनगर, शाहूपुरी, सातारा असे संशयीताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 24 फेब्रुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास प्रथमेश माधवदत्त बेंद्रे वय 20, 8 शिवाजीनगर, शाहुपूरी सातारा याने राहत्या घरी बेडरुममध्ये फॅनला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत शाहुपूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तपासादरम्यान, कोणीतरी अज्ञात व्यक्ती ‘सानिका के’ या नावाने फेसबूक अकाउंटवरून अश्‍लिल चॅटिंग करून अश्‍लिल मेसेज करून प्रथमेश बेंद्रे याच्या बहिणीचा नंबर मागून मानसिक त्रास देत असल्याचे दिसून आले. तसेच तसेच प्रथमेशवर पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत असल्याचेही निदर्शनास आले. याबाबत पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल सातारा येथे पत्रव्यवहार करून तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे गुन्ह्यात अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात आल्यानंतर हा सर्व प्रकार आकाश प्रकाश माने-केंडे करत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी संबंधित बनावट सानिके के नावाचे फेसबूक अकाउंट करणार्‍या आकाश माने-केंडे याच्या विरोधात शाहूपुरी पोलिसांत सायबर सेलअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास पोनि संजय हंकारे करत आहेत. तपासासध्ये सपोनि विशाल वायकर, सहायक फौजदार शामराव भंडारे, पो. ना. अमित झेंडे, पोलिस हवालदार अतिश घाडगे, पोनि श्रीनिवास देशमुख, पो. कॉ. सतीश बाबर, पो. कॉ. सुनील भोसले यांनी सहभाग घेतला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!