
दैनिक स्थैर्य । दि.२४ मार्च २०२२ । सातारा । सातारा शहरातून दोन महिलांच्या गळ्यातून अज्ञाताने सुमारे दीड लाखांहून अधिक किंमतीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले. ही घटना दि. २२ मार्च रोजी तालीम संघ रस्ता, पारंगे चौक सदरबझार या दोन्ही ठिकाणी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दोघा अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन्ही ठिकाणी झालेल्या चोरीमध्ये अज्ञात हे काळ्या रंगाच्या दुचाकीवरील अंदाजे २५ ते ३० वयोगटातील दोघां तरुणांनी ही चोरी केली. त्यांच्या अंगात निळ्या अन काळ्या रंगाचा शर्ट आणि तोंडाला काळ्या रंगाचे मास्क होते.
याप्रकरणी आशाताई विलास देशमुख वय ७५, रा. शनिवार पेठ, सातारा यांनी तक्रार दिली आहे. तर देशमुख यांच्याबरोबरच सरिता श्रीकांत पळसुले यांच्या गळ्यातील दागिने चोरीस गेले आहेत. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत.