“एक बार जो कमिटमेंट कर दी…” फलटण नगरपरिषदेचे ‘बॉस’ आणि जनसामान्यांचे ‘नायक’ समशेरसिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!


स्थैर्य, फलटण, दि. २७ मार्च : राजकारणात अनेक नेते येतात आणि जातात, पण काही नेते असे असतात ज्यांची ‘एन्ट्री’ थेट जनतेच्या हृदयात होते. बॉलीवूडच्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांचा एक गाजलेला डायलॉग आहे- “हम जहाँ खड़े होते हैं, लाईन वहीं से शुरू होती है!” फलटण शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात हा डायलॉग लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना तंतोतंत लागू पडतो. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त फलटणच्या या ‘बॉस’च्या राजकीय आणि प्रशासकीय कारकिर्दीवर टाकलेला हा खास दृष्टिक्षेप!

“रिश्ते में तो हम तुम्हारे ‘बॉस’ लगते हैं…” : उत्तम प्रशासक

नगरपालिकेत प्रशासनावर वचक कसा असावा आणि प्रलंबित विकासकामे मार्गी कशी लावावीत, हे समशेरसिंहांकडून शिकावे. फलटण नगरपरिषदेचे ते खऱ्या अर्थाने ‘बॉस’ आहेत. मात्र, हा बॉस हुकूमशहा नाही, तर जनतेचा हक्काचा सेवक आहे. “डॉन को पकडना मुश्कील ही नही…” तसे समशेरसिंहांच्या विकासाच्या वेगाला आणि त्यांच्या धडाकेबाज ‘व्हिजन’ला पकडणे विरोधकांसाठी आता मुश्कीलच नाही तर नामुमकिन झाले आहे! अनिल कपूरच्या ‘नायक’ चित्रपटाप्रमाणे एका दिवसात सिस्टीम हलवून सोडण्याची ताकद आणि प्रशासकीय कौशल्य त्यांच्याकडे आहे. ‘तारीख पे तारीख’ न देता थेट ‘ऑन द स्पॉट’ निर्णय घेण्यावर त्यांचा भर असतो.

“आम आदमी की ताकद…” : बढेजाव शून्य, जनतेशी नाळ पक्की

पदावर गेल्यावर अनेक नेत्यांना सत्तेचा माज आणि बडेजाव करण्याची सवय लागते. पण समशेरसिंह याला पूर्णपणे अपवाद आहेत. त्यांच्याकडे VIP कल्चरचा लवलेशही नाही. “मेरा नाम है समशेर, और मै चलता हूँ बिना किसी फियर!” अशा बेधडक पण अत्यंत साध्या स्वभावामुळे त्यांची नाळ थेट सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आहे. रात्री-अपरात्री कधीही हाक मारा, हा नेता एसी केबिनमध्ये न बसता थेट रस्त्यावर उतरून जनतेच्या सुख-दुःखात उभा असतो.

“जिंदगी में तीन चीजें कभी अंडरएस्टिमेट मत करना…” : अडचणीत धावून जाणारे नेतृत्व

सर्वसामान्य माणसाला अडचण आली की सर्वात आधी आठवण येते ती समशेरसिंहांची! पाणीप्रश्न असो, रस्त्यांची अडचण असो किंवा रुग्णालयातील वैद्यकीय मदत असो, ते कधीही मागे हटत नाहीत. कोणावरही अन्याय होऊ न देणे आणि हक्काच्या माणसासाठी ढाल बनून उभे राहणे, यामुळे ते खऱ्या अर्थाने गरिबांचे आणि सर्वसामान्यांचे ‘संकटमोचक’ ठरले आहेत.

पित्याचा वारसा: “परंपरा, प्रतिष्ठा आणि विकास…”

राजकारणात वारसा चालवणे सोपे नसते. तो केवळ मिरवायचा नसतो, तर आपल्या कामाने तो अधिक मोठा करायचा असतो. लोकनेते माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या सर्वांगीण विकासाचे आणि जनतेच्या कल्याणाचे जे स्वप्न पाहिले होते, तेच स्वप्न आज त्यांची दोन्ही मुले सत्यात उतरवत आहेत. कै. हिंदुराव साहेबांनी आखून दिलेल्या समाजकारणाच्या आणि पारदर्शक राजकारणाच्या मार्गावर आज रणजितसिंह व समशेरसिंह अत्यंत प्रामाणिकपणे आणि यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहेत. हा खऱ्या अर्थाने एका पित्याच्या स्वप्नांचा सन्मान आहे.

सख्ख्या भावांची साथ: “ये बंधन तो प्यार का बंधन है…”

राजकारणात सत्ता आली की अनेकदा नात्यांमध्ये दुरावा येतो, पण फलटणमध्ये मात्र ‘करण-अर्जुन’ची सख्खी जोडी विकासाचा गाडा अत्यंत भक्कमपणे हाकत आहे. “मेरे करण-अर्जुन आयेंगे…” अशी फलटणकरांची जी विकासाची अनेक वर्षांची अपेक्षा होती, ती या सख्ख्या ‘राम-लक्ष्मणा’च्या जोडीने पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, रणजितदादांचे भक्कम ‘व्हिजन’ आणि दिल्ली-मुंबईतील ताकद, आणि समशेरदादांची फलटणमधील अत्यंत धडाकेबाज अंमलबजावणी, या अनोख्या आणि भक्कम समीकरणातून फलटण शहराचा चेहरामोहरा बदलत आहे.

“नारीशक्तीचा भक्कम आधार…” : जिजामाला वहिनी अन् मनीषा वहिनींची मोलाची साथ

चित्रपटात जसा हिरोला खंबीर साथ देणारा एक भक्कम आधार असतो, तसाच आधार फलटणच्या विकासात ‘नारीशक्ती’चा आहे. “एक औरत की ताकद…” काय असते, हे फलटणकरांनी अनुभवले आहे. फलटण शहरातील महिलांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी रणजितदादांच्या पत्नी सौ. जिजामाला वहिनी आणि समशेरसिंहांच्या पत्नी सौ. मनीषा वहिनी यांची अत्यंत मोलाची साथ मिळत आहे. महिलांचे बचत गट, आरोग्य, सुरक्षितता आणि रोजगाराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या दोन्ही जावा-जावा पडद्यामागे आणि पडद्यावर खंबीरपणे उभ्या आहेत. सख्ख्या भावांच्या या विकासाच्या रथाला त्यांच्या अर्धांगिनींच्या खंबीर साथीमुळे खऱ्या अर्थाने पूर्णत्व आले आहे.

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

गेल्या काही महिन्यात फलटणने विकासाचा जो ट्रेलर पाहिला आहे (१०० कोटींच्या विकासकामांची मंजुरी, भव्य स्टेडियम, प्रशासकीय इमारती), तो पाहता फलटणकर अभिमानाने सांगू शकतात की, “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!” भविष्यात फलटण शहराला देशातील एक मॉडेल ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याचे त्यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.

सत्तेचा कोणताही माज न बाळगता, नेहमी हसतमुख, ‘दिलखुलास’ राहिलेल्या आणि जनसामान्यांसाठी कायम तत्पर असणाऱ्या या फलटणच्या ‘टायगर’ला वाढदिवसाच्या ब्लॉकबस्टर आणि झक्कास शुभेच्छा! समशेरसिंह, “जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए…” आणि फलटणकरांसाठी तुमचे काम खरोखरच खूप मोठे आहे!

– एक परिचित.


Back to top button
Don`t copy text!