दि. २२ ते २६ एप्रिल रोजी जावलीच्या श्री जावलसिद्धनाथाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील जावली येथील श्री जावलसिद्धनाथाच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर देवस्थाने ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेली आहे.

दि. २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेमध्ये श्रींचा हळदी समारंभ संपन्न होणार आहे. दि. २३ एप्रिल रोजी दुपारी १ ते २ या वेळेमध्ये श्रींचा लग्न सोहळा संपन्न होणार आहे. दि. २४ एप्रिल रोजी बकरीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दि. २५ एप्रिल रोजी धडका व बगाडे संपन्न होणार आहे. दि. २६ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता श्रींचा छबिना निघून सकाळी मंडपात परत येऊन पाऊल घडीची पूजा संपन्न होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!