मंगळवार पेठेतील घरकुलांना चालू वर्षापासून घरपट्टी आकारा; नगरसेवक रविंद्र ढोणे यांच्या पुढाकाराने महिलांचे पालिकेला निवेदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१९ नोव्हेंबर २०२१ । सातारा । मंगळवार पेठ ( प्रभाग क्रं १९ ) येथील एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्पातील घरकुलांना 2021-22 या चालू वर्षाची घरपट्टी आकारावी अशी मागणी येथील लाभार्थी महिलांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे .

नगरसेवक रविंद्र ढोणे यांच्या उपस्थितीत महिलांनी त्यांच्या मागणीचे निवेदन पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्याकडे केली . निवेदनात नमूद आहे की झोपडपट्टी सुधारणा अभियाना अंर्तगत येणाऱ्या 43 घरकुलांचा ताबा 7 एप्रिल 2016 रोजी लाभार्थी यांना देण्यात आला होता मात्र येथे वीज शौचालय इतर सुविधा न मिळाल्याने लाभार्थी महिला तेथे रहावयास गेल्या नाहीत . पालिकेने प्रत्यक्ष ताब्यानंतरची घरपट्टी आकारली आहे . जी रक्कम येथील गरजू महिलांना भरणे शक्य नाही . त्यामुळे या घरकुलांना 20 21-22 या वर्षाची घरपट्टी आकारावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . या मागणीचा आम्ही सकारात्मकतेने विचार करू असे आश्वासन कोडगुले यांनी यावेळी चर्चेदरम्यान दिले.


Back to top button
Don`t copy text!