फलटणसह जिल्ह्याच्या शहरी भागामध्ये ऑन दि स्पॉट लसीकरण बंद; ऑनलाईन नोंदणीच बंधनकारक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२१ । फलटण । सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्याअनुषंगाने जिल्हापातळीवरुन उपाययोजना सुरु केल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणचा पहिला डोस सात लाख ७३ हजार ७६८ जणांनी तर दुसरा डोस दोन लाख ८ हजार ५०५ जणांनी असे एकुण नऊ लाख ८२ हजार २७३ एवढ्या नागरिकांनी काल दि. १० जुलै २०२१ अखेर घेतलेला आहे. जिल्ह्यातील संपुर्ण पात्र लाभार्थ्यांना नियोजनबध्द लसीकरण करण्यासाठी जिल्हास्तरावरुन योग्य नियोजन करण्यात येत आहे. त्याचधर्तीवर फलटणसह सातारा, कराड व वाई या फक्त शहरी भागातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण सत्र यापुढे 100 टक्के ऑनलाईन नोंदणीनुसारच घेण्यात येणार आहेत. यामध्ये लस उपलब्धतेनुसार दररोज दुपारी 12 वाजता लसीकरण सत्र https://selfregistration.cowin.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे.

त्यामुळे यापुढे फलटणसह सातारा,कराड व वाई या शहरी भागातील लाभार्थींना ऑन द स्पॉट (on the spot) पध्दतीने लसीकरण करण्यात येणार नाही याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी. दि. १३ जुलै २०२१ पासून लस उपलब्धतेनुसार फलटणसह सातारा, कराड व वाई या शहरी भागातील लाभार्थींनी उपरोक्त संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करुनच लसीकरण करायचे आहे. सदर तालुक्यातील ग्रामीण भागातील लसीकरण सत्र ऑन द स्पॉट पध्दतीनेच सुरु राहणार आहे.


Back to top button
Don`t copy text!