दैनिक स्थैर्य । दि. ०३ एप्रिल २०२३ । सातारा । स्वच्छ मुख अभियान व जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण व अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. क्रांतीसिह नाना पाटील, जिल्हा रुग्णालय सातारा येथे मौखिक तपासणी तसेच तंबाखू मुक्ती समुपदेशन करण्यात आले.
या शिबिरास १०० रुग्ण उपस्थित होते. उपस्थित रूग्णानां टूथ ब्रश व टूथपेस्ट वाटप व रुग्णांना दाताची काळजी कशी घ्यावी याची माहिती देण्यात आली. सर्व रुग्णांची मौखिक आरोग्य तपासणी करून पुढील उपचारास निर्देशित करण्यात आले.
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. मौखिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयीच्या जनजागृतीपर व्हीडिओचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दंतशल्य चिकित्सक डॉ.योगिता शहा व डॉ. अवधूत कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. दिव्या परदेशी जिल्हा सल्लागार NTCP, डॉ. दळवी जिल्हा कार्यक्रम समन्वयक, नर्सिंग कॉलेज मेट्रन,डॉ . प्रतीक कोळेकर, डॉ योगिता शाह, दंत सहायक आझम कवारे, दंत आरोग्यक अनिकेत गावडे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.