
दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । फलटण । जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ढवळ येथे शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास ढवळ गावचे सरपंच मा.अंकुश लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गोरे, रंजीत लोखंडे, ग्रामसेवक विशाल खलाटे, गावातील प्रतिष्ठित नागरिक वैभव काळे, चंद्रकांत गारडे, अंकुश ब लोखंडे, सागर लोखंडे, कुमार घोरपडे तसेच ढवळ हायस्कूल चे मुख्याध्यापक नेरकर सर, सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. हा कार्यक्रम कृषी महाविद्यालय, फलटण चे विद्यार्थी कृषिदूत प्रशांत गायकवाड, स्वप्निल अठराबुद्धे, सुरज काळे,वरद लोळगे, किशोर गांगुर्डे, सिद्धांत गायकवाड, रुपेश ठाकरे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमा मार्फत कृषी दूतांनी सर्व उपस्थित नागरिकांना “आपल्या उद्याला वाचवण्यासाठी पर्यावरणाशी मैत्री करुया”, “झाडे लावूया , झाडे जगवूया” हा मोलाचा संदेश दिला.