दैनिक स्थैर्य | दि. २९ एप्रिल २०२३ | फलटण | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फलटण येथे ८४ वर्षांपूर्वी २३ एप्रिल १९३९ रोजी अस्पृश्य प्रजा परिषद घेतली होती. या दिनानिमित्त सन २०१० पासून आंबेडकरी प्रजा परिषदेचे आयोजन फलटण येथे केले जाते. यामध्ये स्थानिक व राज्यातील विविध भागात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि धम्म कार्य करणार्या १४ व्यक्ती व संस्थांना भीमस्फूर्ती पुरस्काराने गौरविण्यात येते.
सन २०२३ च्या भीमस्फूर्ती पुरस्काराने उमेश कांबळे, डॉ. स्वाती शामराव काळे (पुणे), विजय भंडारे (पाटण), अॅड. बापूसाहेब शिलवंत (विशेष सरकारी वकील), भोलेनाथ भोईटे (अध्यक्ष रोहिदास समाज), जयवंत सिताराम काकडे (से.नि. वॉरंट आफिसर), दिगंबर राजाराम अहिवळे (से. नि. मुख्याध्यापक), सागर चंद्रकात अहिवळे (उद्योजक), विठ्ठलराव मारूती काकडे (से.नि. न्यायाधीश), चंद्रकांत जगताप (उद्योजक- मुंबई), चाँदतारा मस्जिद ट्रस्ट (शुक्रवार पेठ), बुद्ध जयंती समिती (सन २०२२) फलटण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती, फलटण यांना देण्यात आला. ज्येष्ठ बांधवांच्या हस्ते सर्व पुरस्कार वितरित करण्यात आले.
यावेळी प्रबुद्ध विद्याभवनच्या विद्यार्थ्यांचा भीमगीतांवर आधारीत आंबेडकरी सास्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
या परिंषदेची संकल्पना नियोजन व व्यवस्था १३ वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर इग्नायटेड मिशन व डॉ. बाबसाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीने आणि आंबेडकरी बांधवांच्या सहकार्याने केले जाते.
संस्थाध्यक्ष सिद्धार्थ प्रबुद्ध यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन केले तर संविधान प्रास्ताविकेचे वाचन प्रा. वर्धमान अहिवळे, पुरस्कार प्रमाणपत्रांचे वाचन कुणाल काकडे, अक्षय कांबळे, संदीप अहिवळे, हेमंत कांबळे, सचिन अहिवळे यांनी केले. उपस्थितांचे आभार सचिव मिलिंद अहिवळे यांनी मानले.
आंबेडकरी प्रजा परिषद यशस्वी करण्यासाठी सनी मोरे, जयकुमार रणदिवे, दयानंद पडकर, सचिन अहिवळे, सागर सोरटे, हरिश काकडे, राकेश जगताप, सनी काकडे, अॅड.प्रशांत काकडे, प्रशांत अहिवळे, संदीप मोरे, संजय गायकवाड, अॅड. अनिकेत अहिवळे, शुभांगीताई खरात, उदय सं. काकडे, सुखदेव येवले (परिवार), निताताई काकडे (परिवार) सनी अहिवळे, दीपक अहिवळे यांनी विशेष सहकार्य केले.
परिषदेसाठी मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते.