
दैनिक स्थैर्य । दि. २८ जानेवारी २०२३ । पंढरपूर । गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त चंद्रभागा नदी वरील महाव्दार घाटावरील दुर्बल, वंचित, अंध, अंपग, भिक्षेकरी यांना जिलेबी वाटप करून गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिवादन करण्यात आले.
या दुर्बल घटकातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना शिवभोजन हे मोफत मिळाले पाहिजे, त्यांना राहण्यासाठी जागा मिळाली पाहिजे या दुर्बल घटकातील लोकांनकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. असं युवासेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर यांनी म्हटले आहे.
गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी गोर गरिबी गरजू लोकांना त्यावेळी त्यांचा हक्क मिळवून दिला. पण आज अश्या दुर्बल घटकातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे अन्यथा आम्ही या लोकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी श्रीनिवास उपळकर यांनी प्रशासनाला दिला आहे.
यावेळी तालुका प्रमुख संजय घोडके, महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, जेष्ठ शिवसैनिक अरूण कांबळे, विभाग प्रमुख बाबासाहेब अभंगराव, वंचित आघाडीचे बबलू बोराळकर, युवा सेना उप शहरप्रमुख अतिश काळे, शहर समन्वयक स्वप्निल गावडे, युवा सैनिक विशाल डोंगरे, संपत सर्जे, प्रताप अधटराव, सुरज कांबळे आदी उपस्थित होते.