महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण ‘रशियन हाऊस इन मुंबई’ च्या संचालिका विशेष निमंत्रित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०२ एप्रिल २०२२ । मुंबई । महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते आणि विधानपरिषदेच्या उपसभापती मा.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 08.00 वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या समारंभास ‘रशियन हाऊस इन मुंबई’ या रशियन विज्ञान आणि सांस्कृतीक केंद्राच्या संचालिका डॉ.एलिना रेमिझोव्हा उपस्थित होत्या.

‘रशियन हाऊस इन मुंबई’च्या संचालिका यांची विधान भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट.

या समारंभानंतर डॉ.एलिना रेमिझोव्हा यांनी मा.सभापती मा.ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि मा.उपसभापती मा.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतांना त्यांनी मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या प्रमुख दोन शहरांमध्ये झालेल्या सिस्टर सिटी कराराला या वर्षीं 55 वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगून त्यानिमित्त आजपर्यंतच्या वाटचालीला उजाळा दिला. महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या संदेशात सभापती महोदयांनी भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबंधाच्या गौरवशाली परंपरेचा आवर्जून उल्लेख केला, त्याबद्दल त्यांनी या भेटीप्रसंगी अतिशय आनंद व्यक्त करीत ‘रशियन हाऊस इन मुंबई’ तर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली आणि या केंद्राला भेट द्यावी, असे निमंत्रण दिले. उप सभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आपल्या रशिया भेटीतील अनुभवांना यावेळी उजाळा देत मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग शहरांना लाभलेला समृध्द सांस्कृतीक वारसा, अनुभव, पर्यावरण संवर्धन आणि साहित्य अनुवाद याबाबत आणखी आदानप्रदान व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पाहूण्यांना गौरवचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!