शिवजयंती निमित्त किल्ले प्रतापगड येथे जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२३ । सातारा । जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्यावतीने दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले प्रतापगड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने पुढीलप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ७ वा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते भवानी मातेचा अभिषेक, ८ वा महापूजा, ९ वा. ध्वजबुरुज येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, ९.३० वा. भवानी माता मंदीरसमोर ध्वजारोहण. ९.३५ वा. पालखी मिरवणूक, १० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व जय जय  महाराष्ट्र माझा या गीतास राज्य गीत म्हणून अंगिकरण्याचा कार्यक्रम. राज्य गीत गायन, पोवाडा गायन व सांस्कृतिक कार्यक्रम, या प्रमाणे कार्यक्रम संपन्न होणार आहे.

दहावी व बारावी परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू
सातारा दि. 18 : जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी.) परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 21 मार्च 2023 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी.) परीक्षा दिनांक 02 मार्च 2023 ते दिनांक 25 मार्च 2023 या कालावधीत विभागीय सचिव, कोल्हापूर विभागीय मंडळ यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात व त्या सभोवतालच्या 50 मीटर परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी प्रशांत आवटे यांनी दिले आहेत.
सातारा जिल्ह्यातील केंद्रावर व उपकेंद्रावर होणा-या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एस.एस.सी.) परीक्षेसाठी दिनांक 02 मार्च 2023 च्या 00-00 वाजलेपासून ते 25 मार्च 2023 चे 24-00 वाजेपर्यंत या कालावधीत तसेच सातारा जिल्हयातील केंद्रावर व उपकेंद्रावर होणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एच.एस.सी.) परीक्षेसाठी दिनांक 21 फेब्रुवारी 2023 चे 00.00 वाजलेपासून ते 21 मार्च 2023 चे 24-00 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षा केंद्र व उपकेंद्राचे परिसरात व त्या भोवतालचे 50 मीटर परिसरात परीक्षार्थी परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेश करणेसाठी तसेच परीक्षेचे कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरापासून 50 मीटर पर्यंतची एस. टी. डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशिन, चालू ठेवण्यास याद्वारे मनाई प्रतिबंध करण्यात आला आहे.

Back to top button
Don`t copy text!