दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२३ । फलटण ।
संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट आणि समाजाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहोळयानिमित्त येथील संत सावता महाराज मंदिरात दि. १० ते दि. १७ जुलै दरम्यान भजन, प्रवचन, कीर्तनादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ९ ते ११ गाथा भजन, सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० महिला भजनी मंडळ भजन, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ७ ते ९ कीर्तन असा नित्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
या सोहोळयानिमित्त आज रविवार दि. १६ रोजी दुपारी १ वाजता श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पादुका आणि प्रतिमेची मिरवणूक सजविलेल्या रथातून काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन पुन्हा मंदिरात पोहोचल्यानंतर मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणुकीत ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब शेंडे व सर्व ट्रस्टी यांच्या सह ट्रस्टचे सर्व सभासद, समाजबांधव स्त्री – पुरुष सहभागी झाले होते. तरुणांची संख्या मोठी होती. उद्या सोमवार दि. १७ रोजी सोहोळयाची सांगता होणार असून सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. आदिनाथ महाराज फपाळ, माजलगाव यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाने सोहोळयाची सांगता होणार आहे.