सद्गुरू महादेवनाथ महाराज पुण्यतिथीनिमित्त वाखरीत उद्यापासून ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 5 मार्च 2025। फलटण । वाखरी, शांतीधाम (जाधव वस्ती) ता. फलटण येथे गुरुवार दि. 6 मार्च पासून ते रविवार दि. 9 मार्च अखेर ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे 5 वाजता हरिनाम, अभिषेक व आरती, सकाळी साडेआठ वाजता अल्पोपहार, नऊवाजता ग्रंथवाचन, बारा वाजता नैवेद्य, दुपारी 1 वाजता महाप्रसाद तसेच रात्री नऊ ते 11 या वेळेत भजन व जागर आदी कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार दि. 7 मार्च रोजी सकाळी 10 वाजता भजन, होणार असून दुपारी 12 वाजता सद्गुरु महादेवनाथ महाराज समाधी सोहळा निमित्त पुष्पवृष्टी होणार आहे.

शनिवार दि. 8 मार्च रोजी महिलादिनानिमित्त दुपारी साडे बारा वाजता नारी सन्मान हा कार्यक्रम होणार आहे.

रविवार दि. 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ह.भ.प. नंदकुमार महाराज कुमठेकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. दुपारी 12 वाजता महानैवेद्य व आरती होणार आहे. दुपारी 1 वाजता ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आहे. दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास सहभागी होेण्याचे आवाहन सद्गुरु महादेवनाथ महाराज शांति सेवा मंडळाचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प.केशव महाराज जाधव यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!