दैनिक स्थैर्य | दि. ६ मार्च २०२३ | फलटण |
जागतिक महिला दिनानिमित्त बुधवार, दि. ८ मार्च रोजी फलटण शहर व तालुक्यातील महिलांच्या आरोग्यासाठी मोफत रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वयंसिध्दा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा अॅड. सौ. मधुबाला भोसले यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना अॅड. सौ. भोसले म्हणाल्या, श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था, महाराजा मल्टीस्टेट, श्रीराम बझार, महाराष्ट्र साहित्य परिषद व स्वयंसिद्धा संस्था समूह यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मिरज-सांगली येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सेवा सदन लाईफ लाईन यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून फलटण शहर व तालुक्यातील एक हजार महिला या शिबिराचा लाभ घेणार आहेत.
या शिबिरामध्ये हृदयविकार, मेंदू विकार, मोतीबिंदू, बायपास शस्त्रक्रिया, कॅन्सरची तपासणी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, फिट, पॅरॅलिसिस, डोकेदुखी, चक्कर, स्नायूंचे आजार, किडनी विकार, हर्निया, मुळव्याध, पित्ताशयातील खडे, अपेंडिक्स पोटाच्या व इतर शस्त्रक्रिया रोग तपासणी व मोफत दरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
बुधवार, दि. ८ मार्च रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत महाराजा मंगल कार्यालय, फलटण या ठिकाणी हे शिबिर संपन्न होत असून तालुक्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अॅड.सौ. मधुबाला भोसले यांनी केले आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)