
दैनिक स्थैर्य । दि. २२ मार्च २०२३ । बारामती । बारामती शहरातील जळोची मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जळोची मध्ये शिखर शिंगणापूर (माण तालुका सातारा जिल्हा) येथील महादेवाच्या कावडीचे पूजन करून गावातील महाकाळेश्वर व इतर देवांना धार घालुन कावड भाविकांच्या दर्शनासाठी उभी करणेत आली या वेळी जळोची मधील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्तीत होते.
शंभु महादेवाची कावड 2 एप्रिल रोजी मुंगी घाटा द्वारे शिंगणापूर ला प प्रस्थान होणार असून या मध्ये भाविक मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात या वर्षी कावड समवेत बालका पासून ते ज्येष्ठा पर्यंत सर्वांनी सहभाग घ्यावा असे आव्हान श्री संत सावता माळी तरुण मंडळ व श्रीनाथ म्हस्कोबा यात्रा कमिटी जळोची च्या विश्वस्त यांनी केले आहे.