गुड फ्रायडेनिमित्त येशूंच्या मानवतावादी विचारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्मरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.०३: गुड फ्रायडेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येशू ख्रिस्ताच्या दया, क्षमा, शांती, प्रेम, त्यागाच्या संदेशाचं व सेवाकार्याचं स्मरण केलं असून येशूंची मानवसेवेची शिकवण सर्वांनी आचरणात आणावी, असं आवाहन केले आहे.

गुड फ्रायडेच्या निमित्तानं दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, येशूंच्या प्रेम, त्याग, दया, क्षमा, शांतीसारख्या उदात्त विचारांचं, मानवसेवेच्या कार्याचं स्मरण करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी येशूंनी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांनी केलेला त्याग आणि दिलेले विचार मानवजातीचं कल्याण करत राहतील. कोरोनामुळे जग संकटात असताना येशूंचा मानवसेवेचा, विश्वकल्याणाचा संदेशच जगाला वाचवणार आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.


Back to top button
Don`t copy text!