दैनिक स्थैर्य | दि. 26 डिसेंबर 2023 | पुणे | मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावर राज इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक राम निंबाळकर यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील रक्तदान शिबिरामध्ये 67 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. सर्व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सामाजिक दायित्वाबद्दल राज इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीने आभार मानण्यात आले.